फक्त 70 हजारांच्या बजेटमध्ये आली होंडाची जबरदस्त बाईक, Hero Splendor ला देणार टक्कर

2025 Honda Shine 100 Launched | भारतीय बाजारात एकापेक्षा एक स्वस्त बाईक लाँच होत आहेत. बाजारात Hero Splendor आणि TVS Radeon सारख्या स्वस्त बाईक्स आधीपासूनच उपलब्ध आहेत. आता होंडा इंडियाने Shine 100 चे नवीन मॉडेल लाँच केले आहे. 

होंडा इंडियाने 2025 Shine 100 हे कमी किंमतीत येणारे मॉडेल लाँच केले आहे. या नवीन बाईकची सुरुवाती किंमत फक्त 68,767 रुपये (एक्स-शोरूम) आहे. 2025 Shine 100 ला कंपनीने फक्त एकाच व्हेरिएंटमध्ये लाँच केले आहे. ही बाईक एकूण पाच रंगांमध्ये उपलब्ध आहे. 

बाईकची बुकिंग सर्व होंडा डिलरशिपवर सुरू झाली आहे, तर डिलिव्हरी एप्रिल 2025 च्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होईल.या नवीन शाइन 100 मध्ये OBD2B मानकनुसार इंजिन आणि नवीन ग्राफिक्स देण्यात आले आहेत. होंडाच्या या नवीन बाईकविषयी सविस्तर जाणून घेऊयात.

नवीन 2025 Shine 100 मध्ये मिळतील जबरदस्त फीचर्स

नवीन 2025 Shine 100 मध्ये OBD2B मानकनुसार इंजिन देण्यात आले आहे. हे नवीन उत्सर्जन नियमांनुसार तयार केले आहे. बाईकमध्ये नवीन स्टिकर्स आणि ग्राफिक्स देण्यात आल्यामुळे स्टाइलमध्ये थोडा बदल दिसून येतो.

ही बाईक 100cc सिंगल-सिलेंडर एअर-कूल्ड इंजिनसह येते, जे 7.61bhp ची पॉवर आणि 8.05Nm टॉर्क निर्माण करते. यासोबत 4-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आले आहे. 

होंडाच्या या बाईकमध्ये हॅलोजन हेडलाइट आणि बल्ब टर्न इंडिकेटर्स देण्यात आले आहेत. तसेच, ट्विन-पॉड इन्स्ट्रुमेंट कन्सोल आणि सुरक्षेसाठी साइड-स्टँड सेन्सरही दिले आहे.  याशिवाय, या बाईकमध्ये कंबाइंड ब्रेकिंग सिस्टम (CBS) मिळेल.