Maharashtra HSC Board Exam 2025: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने काही महिन्यांपूर्वीच बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. येत्या मंगळवारपासून (11 फेब्रुवारी) बारावीच्या परीक्षेला सुरुवात होणार आहे. तर 11 मार्चपर्यंत ही परीक्षा चालणार आहे.
mahassscboard.in. या अधिकृत वेबसाइटवर बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. याशिवाय, विद्यार्थ्यांना हॉल तिकीटचे देखील वाटप करण्यात आले आहे. या हॉल तिकीटवर परीक्षेसंदर्भात महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परीक्षेच्या तारखा व वेळ यासह इतर आवश्यक सूचना यावर नमूद करण्यात आल्या आहेत.
अनेक परीक्षेच्या दिवशी विद्यार्थ्यांची गडबड होते. त्यामुळे बोर्डाकडून विद्यार्थ्यांना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांनी आधीच परीक्षा केंद्राची पाहणी करावी, ज्यामुळे ऐन परीक्षेच्या दिवशी गडबड होणार नाही. याशिवाय, परीक्षेला जाताना हॉल तिकीट सोबत बाळगणे आवश्यक आहे. अन्यथा परीक्षा केंद्रात प्रवेश मिळणार नाही.
विद्यार्थी परीक्षेला जाताना पेन, पॅड व परवानगी असलेले साहित्यच घेऊन जाऊ शकतात. विद्यार्थ्यांना पेपर सोडवताना 10 मिनिटं अतिरिक्त देखील दिली जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देताना याचा फायदा होणार आहे.