2025 Honda Activa 110 : भारतीय बाजारात सर्वाधिक विक्री होणाऱ्या Honda Activa स्कूटरचे नवीन मॉडेल लाँच झाले आहे. कंपनीने 2025 Honda Activa 110 ला लाँच केले असून, जुन्या मॉडेलच्या तुलनेत यात काही बदल करण्यात आले आहेत. कंपनीने या स्कूटरला 1 लाख रुपयांच्या बजेटमध्ये लाँच केले आहे. याशिवाय, यामध्ये ग्राहकांना 3 वेगवेगळे व्हेरिएंट्स आणि 6 रंगाचे पर्याय देखील उपलब्ध आहेत.
2025 Honda Activa 110 मध्ये नवीन काय आहे?
2025 Honda Activa स्कूटरला कंपनीने 109 सीसी क्षमतेच्या सिंगल सिलेंडर इंजिनसह लाँच केले आहे. हे इंजिन hp पॉवर आणि 9.05 Nm टॉर्क जनरेट करते. यामध्ये आइडलिंग स्टॉप सिस्टम देण्यात आली आहे. ज्यामुळे अधिक माइलेजचा फायदा मिळेल.
नवीन स्कूटरमध्ये सर्वात मोठा बदल हा डिस्प्लेचा आहे. यामध्ये नवीन TFT कलर डिस्प्ले देण्यात आला आहे. टीएफटी डिस्प्लेमध्ये माइलेज इंडिकेटर, ट्रिप मीटर, ईको इंडिकेटर आणि फ्यूलशी संबंधित माहिती मिळते. याशिवाय, यात टाइप सी चार्जिंग पोर्ट दिला असून, यामुळे प्रवास करतानाही फोन अथवा इतर डिव्हाइस चार्जिंग करता येईल.
2025 Honda Activa ची किंमत
2025 Honda Activa ला कंपनीने मेटालिक रेड, पर्ल ब्लॅक, पर्ल व्हाइट, मेटालिक ब्लू, मॅट ग्रे आणि पर्ल ब्लू या 6 रंगात लाँच केले आहे. ही स्कूटर एसटीडी, डीएलएक्स आणि एच-स्मार्ट या तीन व्हेरिएंटमध्ये येते. स्कूटरच्या एसटीडी व्हेरिएंटची किंमत 80,950 रुपये (एक्स-शोरूम) आहे. टॉप व्हेरिएंटच्या किंमतीचा कंपनीने अद्याप खुलासा केलेला नाही. मात्र, याची किंमत एसटीडी व्हेरिएंटपेक्षा अधिक असेल.