2025 Suzuki Access 125 : काही दिवसांपूर्वीच सुझुकीने भारत मोबिलिटी एक्स्पोमध्ये 2025 Suzuki Access 125 या स्कूटरला लाँच केले होते. आता या स्कूटरच्या फीचर्स आणि किंमतीबद्दल माहिती समोर आली आहे. तुम्ही जर कमी बजेटमध्ये येणारी स्टाइलिश आणि मायलेज-फ्रेंडली स्कूटर शोधत असाल तर 2025 Suzuki Access 125 तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकते.
2025 Suzuki Access 125 ची किंमत
नवीन सुझुकी एक्सेस 125 स्टँडर्ड एडिशन, स्पेशल एडिशन आणि राइड कनेक्ट एडिशन या तीन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. स्कूटरच्या तिन्ही व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत अनुक्रमे 81,700 रुपये, 88,200 रुपये आणि 93,300 रुपये आहे.
2025 Suzuki Access 125 चे स्पेसिफिकेशन्स
नवीन Suzuki Access 125 ला कंपनीने आकर्षक डिझाइनसह सादर केले आहे. यात स्टायलिश हेडलॅम्प, स्लीक बॉडिवर्क, क्रोम अॅक्सेंट्स आणि LED लाइटिंग, स्लीक टर्न इंडिकेटर्स आणि LCD डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर दिले आहे. याशिवाय, डिजिटल क्लस्टरमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीचा सपोर्ट मिळतो, ज्यामुळे तुम्ही स्मार्टफोन कनेक्ट करून टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, व्हॉट्सअॅप आणि कॉल/SMS अलर्ट, वेदर अपडेट, ETA अपडेट, बॅटरी स्टेटस आणि स्पीड अलर्ट यांसारख्या सुविधांचा फायदा घेऊ शकता.
स्कूटरमध्ये 124cc, सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड इंजिन देण्यात आले असून, हे इंजिन 8.4hp पॉवर (6500 RPM वर) आणि 10.2 Nm टॉर्क (5000 RPM वर) निर्माण करते. स्कूटर CVT गिअरबॉक्ससह येतेहे इंजिन OBD-2B एमिशन नॉर्म्सनुसार तयार आहे. . तसेच, Suzuki Eco Performance (SEP) टेक्नॉलॉजीसह सुसज्ज असून, यामुळे उत्तम मायलेज मिळते.
यात सुरक्षेसाठी स्टँडर्ड व्हेरियंटमध्ये ड्रम ब्रेक, स्पेशल एडिशन आणि रायड कनेक्ट एडिशनमध्ये फ्रंट डिस्क ब्रेक, पासिंग स्विच, हॅझर्ड लाइट आणि ब्रेक लॉक सारखे फीचर्स देखील मिळतील. तुम्ही जर 1 लाखांच्या बजेटमधील स्कूटर शोधत असाल तर 2025 Suzuki Access 125 एक चांगला पर्याय आहे.