६ वर्षानंतर एसटी कर्मचार्‍यांना मिळणार गणवेशासाठी कापड

मुंबई- एसटी महामंडळातील चालक, वाहक आणि अभियांत्रिकी कर्मचार्‍यांना गेल्या ६ वर्षांपासून गणवेश पुरवण्यात आलेले नाहीत. २०१९ मध्ये कर्मचाऱ्यांना नव्या पद्धतीचे तयार गणवेश मिळाले. मात्र ते अमान्य असल्याने वापरण्यात आले नाहीत . त्यानंतर गतवर्षी पुन्हा यासाठी निविदा प्रक्रिया राबविली. त्यानुसार आता प्रत्यक्षपणे एसटी कर्मचार्‍यांना दोन गणवेश कापडाचे वाटप सुरू करण्यात आले आहे.

नागपूर आणि अमरावती प्रादेशिक १० विभागातील एसटी कर्मचार्‍यांना नुकतेच दोन गणवेशाचे कापड वितरित करण्यात आले आहे. कर्मचार्‍यांना कापड आणि शिलाई भत्ता पाचशे रुपये देण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे २०१९-२० साठी असलेले गणवेश कापड २०२४ मध्ये दिले जात आहे. दरम्यान,गेल्या सहा वर्षांत या कर्मचाऱ्यांनी पदरमोड करून स्वतः गणवेश शिवून घेतले आहेत. त्यामुळे बाजारभावानुसार सहा वर्षांतील कापड व शिलाई रक्कम महामंडळाने एसटी कर्मचार्‍यांना द्यावेत, अशी मागणी महाराष्ट्र एस.टी कर्मचारी कॉंग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top