क्वालालंपूर – पैसा म्हणजेच सर्व काही असे अनेकांना वाटते.परंतु पैशांच्या पलीकडेसुद्धा सुख आहे. फक्त त्याचा शोध घेता आला पाहिजे,याचा प्रत्यय देणारी घटना नुकतीच मलेशियात घडली आली आहे. तब्बल ४० हजार कोटींहून अधिक मालमत्ता असलेल्या एका उद्योगपतींच्या मुलाने दीक्षा घेत भिख्खू होण्याचा मार्ग निवडला आहे.अजहन सिरीपान्यो असे या मुलाचे नाव असून तो मलेशियातील अब्जाधीश आनंदा कृष्णन यांचा मुलगा आहे.
आनंदा कृष्णन हे मलेशियात दूरसंचार क्षेत्रातील मोठे नाव आहे. आनंदा कृष्णन यांना वेन अजहन सिरीपान्यो हा एकुलता एक मुलगा आहे. तो आता बौद्ध भिख्खू बनला आहे. त्याने त्याच्या सर्व संपत्तींचा त्याग केला आहे.आनंदा कृष्णन यांना ‘एके’ नावाने ओळखले जाते.’एके’ हे मलेशियातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती आहे.दूरसंचार, मीडिया,रिअल इस्टेटसारख्या वेगवेगळया क्षेत्रात त्यांचा उद्योग पसरला आहे.’एअरसेल’ हीदेखील त्यांचीच कंपनी आहे.
वयाच्या १८ व्या वर्षी वेन अजहन सिरीपान्यो हे आपल्या आईच्या कुटुंबाला भेटण्यासाठी थायलंडला गेले होते.यादरम्यान त्यांना जो अनुभव आला त्यामुळे त्यांनी कायमस्वरूपी भिख्खू म्हणून जीवन जगण्याचा निर्णय घेतला. अजहन आता एक वन संन्यासी म्हणून जीवन जगत आहे.ते ‘दाताओ डॅम’ विहाराचे प्रमुख आहेत. थायलंड राजघराण्यातील ते वंशजदेखील आहेत. सिरीपान्यो यांना आठ भाषा येतात.इंग्रजी,तमीळ आणि थाई भाषादेखील बोलता येते.बौद्ध भिख्खू झाल्यानंतरही ते आपल्या वडिलांना भेटण्यासाठी वेळ काढतात. कारण बौद्ध धर्मातील सिद्धांत कौटुंबिक प्रेमावरही भर देतो.