३१ मार्च रोजी पैठणमध्ये विश्वविक्रमी दिंडी सोहळा

पैठण- यंदा एकनाथ महाराजांच्या समाधीचे ४२५ वे वर्ष असून त्यानिमित्त श्रीक्षेत्र पैठण नगरीत ३१ मार्च रोजी विश्वविक्रमी दिंडी सोहळा आयोजित केला आहे.महाराष्ट्रातील दिंड्यांच्या इतिहासातील ही सर्वांत मोठी दिंडी असेल. त्यामुळे या सोहळ्याची विश्वविक्रमात नोंद होणार आहे.

या दिंडी सोहळ्याचे संयोजक नाथवंशज हभप श्री योगिराज महाराज गोसावी यांनी सांगितले की, या दिंडीमध्ये हजारो टाळकरी,झेंडेकरी सहभागी होणार आहेत.एकनाथ षष्ठीच्या दिवशी जी
नाथवंशजांची मानाची पहिली निर्याण दिंडी असते तीच दिंडी यावेळी निघणार आहे. ३१ रोजी सकाळी ९ वाजता समस्त नाथ वंशजांच्या अधिपत्याखाली या दिंडीचे गावातील नाथ मंदिरातून प्रस्थान होईल. यादिवशी नाथमहाराज समाधी सोहळ्याचे मानाचे कीर्तन होऊन हा सोहळा पूर्णत्वाकडे जाईल. या दिंडीमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी आपला टाळ,झेंडा सोबत आणावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top