२८० मिनीबस कमी केल्या बेस्टच्या सेवेवर ताण

मुंबई – २८० मिनीबस सेवेतून कमी केल्यामुळे बेस्ट बस सेवेवर सध्या मोठा ताण पडत आहे.विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत बेस्ट बसच्या फेऱ्यांमध्ये बदल केले होते. आता निवडणुकीची धामधूम संपली आणि बेस्ट बस पूर्ण क्षमतेने सुरू झाल्या. मात्र मुंबईत बेस्ट बसची संख्या अपुरी असून प्रवाशांना बस स्थानकावर ताटकळत रहावे लागते. . सुमारे २८० मिनी बसेस सेवेतून काढून टाकल्या आहेत. सध्या बेस्ट प्रवाशांच्या सेवेत अंदाजे फक्त २,९०० बस आहेत. यामध्ये १,१०० बस बेस्टच्या मालकीच्या आहेत.उर्वरित बस या भाडेतत्त्वावरील कंत्राटी आहेत. या संदर्भात बेस्टच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की,२ आठवड्यांपूर्वी कंत्राटदारांना जलद वितरण आणि विलंब दंड याबाबत नोटीस बजावली होती. तरी सुद्धा अद्याप बसेसची डिलिव्हरी झालेली नाही. जर हे असेच सुरु राहिले,तर पुढच्या महिन्यात बेस्टच्या कामकाजात अधिक अडथळा निर्माण होईल.
दरम्यान ,‘आमची मुंबई आमची बस’ या प्रवासी संघटनेने बेस्टकडे एक याचिका सादर केली आहे. यामध्ये ‘परवडणारी सार्वजनिक वाहतूक सेवा हा आमचा मुलभूत अधिकार आहे. बीएमसी बजेटचा भाग म्हणून बेस्टला सबसिडी द्या आणि चालवा. सार्वजनिक वाहने ही अत्यावश्यक सेवा आहे, कोणता व्यवसाय नाही. कॉन्ट्रॅक्टर-ऑपरेटेड बस बंद करा आणि बेस्टच्या स्वत:च्या ताफ्यातील बस पूर्ण क्षमतेने सुरू करा. तसेच बंद केलेले बस मार्गही सुरू करा. २,००० लोकसंख्येमागे १ बस अशाप्रकारे आम्हाला निदान ६,००० बसची आवश्यकता असल्याचे नमूद केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top