२७ देशांच्या युरोपियन पार्लमेंटसाठी मतदान

स्ट्रेसबर्ग फ्रान्स- २७ देशांच्या युरोपियन पार्लमेंटच्या निवडणुकीसाठीच्या मतदानाच्या आजच्या शेवटचा दिवशी आज एकूण २१ देशांमध्ये मतदान झाले. या निवडणुकीसाठी एकूण ३७ कोटी ३० लाख लोकांनी मतदान केले. यासाठीचे मतदान ६ जूनपासून सुरु झाले होते आज त्याचा शेवटचा दिवस होता.
२७ देशांच्या युरोपियन पार्लमेंटमध्ये फ्रान्स, जर्मनी, इटली, नेदरलँड, ऑस्ट्रिया, इस्टोनिया, लिथोनिया, स्वीडन, आर्यलंड, चेक रिपब्लिकन, लातविया, माल्टान, स्लोवाकिया, फिनलंड सारख्या अनेक लहान मोठ्या देशांचा समावेश आहे. सध्याच्या जागतिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर विश्व शांतीसाठी किंवा या बाबतची युरोपियन पार्लमेंटची भूमिका महत्त्वाची ठरणार असून अमेरिका चीन मधील वाढता तणाव, जगातील पर्यावरणाचे महत्त्वाचे मुद्दे त्याचप्रमाणे अमेरिकन अध्यक्षपदाची निवडणूक हे या निवडणुकीतील महत्त्वाचे मुद्दे आहेत. या निवडणुकीत एकूण ७२० जागांसाठी मतदान झाले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top