मुंबई- मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे गुरुवार १७ ऑक्टोबर रोजी ६ तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या ६ तासांदरम्यान विमानतळावरुन कोणत्याही विमानाचे उड्डाण होणार नाही.
या विमानतळाच्या दोन्ही धावपट्टीवर पावसाळ्यानंतरच्या देखभालीचे काम केले जाणार आहे. हा विमानतळाच्या पावसाळ्यानंतरच्या सर्वसमावेशक धावपट्टी देखभाल योजनेचा भाग असतो.यासंदर्भात सहा महिने आधीच एअरमनला नोटीस देखील पाठवली आहे,असे मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडने एका निवेदनात स्पष्ट केले आहे. १७ ऑक्टोबर रोजी या विमानतळावरील दोन्ही धावपट्ट्या सकाळी ११ ते संध्याकाळी ५ यावेळेत तात्पुरत्या कार्यान्वित राहणार नाहीत.