हिरामण खोसकरांचा राजीनाम्याचा इशारा

मुंबई – धनगर समाजाला अनुसुचित जमात प्रवर्गातून आरक्षण देण्यास काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांनी कडाडून विरोध केला आहे. धनगर समाजाला एसटीमधून आरक्षण दिल्यास आमदारकीचा तत्काळ राजीनामा देण्याचा इशारा खोसकर यांनी दिला आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यास आमचा विरोध आहे. यासंदर्भात नरहरी झिरवळ यांच्याशी आमची दोन तास चर्चा झाली आहे.आमच्या आरक्षणातून धनगर समाजाला आरक्षण दिले जाऊ नये. त्यांना स्वतंत्रपणे आरक्षण द्यावे.आम्ही त्याला विरोध करणार नाही. आज परिस्थिती अशी आहे की आई-वडिलांनी मोलमजुरी करून मुलांना शिकवले. पण त्या मुलांना नोकऱ्या मिळत नाहीत.शिकलेली अनेक मुले नाईलाजाने बिगारी काम करतात. धनगर समाजाला आमच्या आरक्षणातून आरक्षण दिल्यास आमच्या मुलांना नोकरी मिळणे अधिक कठीण होईल. त्यांच्यासमोर मोलमुजुरी करण्याशिवाय पर्यायच शिल्लक राहणार नाही,असे खोसकर म्हणाले .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top