हिमाचलमध्ये गाय व म्हशीच्या दुधाच्या भावात ६ रुपयांची वाढ

शिमला – हिमाचल प्रदेशात गाय आणि म्हशीचे दूध आता महाग झाले आहे. दुधाच्या दरात प्रत्येकी ६ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी आज सादर केलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात ही घोषणा केली.

या वाढीनंतर हिमाचलमध्ये गाईच्या दुधाचा दर ४५ रुपयांवरून ५१ रुपये प्रति लिटर, तर म्हशीच्या दुधाचा दर ५५ रुपयांवरून ६१ रुपये प्रति लिटर झाला आहे. अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी मुख्यमंत्री सखू यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट करत लिहिले, आज मी हिमाचल प्रदेशचा सुवर्ण अर्थसंकल्प सादर करत आहे. यातून स्वावलंबी राज्याची संकल्पना साकार होईल. सव्वा वर्षांत आम्ही जनतेचा विश्वास पुन्हा प्राप्त केला आहे. विकासाचे नवे उच्चांक रचले आहेत.