*अरविंद केजरीवाल यांचे
मोदींना आव्हान
नवी दिल्ली – आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा व दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी छत्रसाल स्टेडियमवर जनता न्यायालयाचे आयोजन केले होते.यावेळी केजरीवाल यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. पंतप्रधान मोदी यांना आव्हान देत ते म्हणाले की, फेब्रुवारीमध्ये दिल्लीच्या विधानसभा निवडणुका आहेत.पण हिंमत असेल तर या निवडणुका महाराष्ट्र आणि झारखंडसोबत घेऊन दाखवा.
यावेळी केजरीवाल पुढे असेही म्हणाले की,फेब्रुवारी २०२५ मध्ये दिल्ली विधानसभेची निवडणूक होणार आहे. दिल्लीच्या निवडणुकीपूर्वी त्यांनी आपल्या एनडीएप्रणित
२२ राज्यांमध्ये वीज मोफत केली तर मी दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाचा प्रचार करीन . मी काल टीव्हीवर एक्झिट पोल पाहताना जम्मू – काश्मिरात भाजपची डबल इंजिन सरकारे मागे पडत असल्याचे मला दिसले. उत्तर प्रदेशातही डबल इंजिन सरकारच्या लोकसभेला अर्ध्याच जागा आल्या. पहिले इंजिन जूनमध्ये बंद पडले. आता झारखंड आणि महाराष्ट्रातही हेच होणार असल्याचे केजरीवाल यांनी यावेळी सांगितले.