हार्बरवर तांत्रिक बिघाड लोकल सेवा विस्कळीत

मुंबई – गोवंडी ते मानखुर्द दरम्यान आज संध्याकाळच्या सुमारास ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने हार्बर मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाली. या बिघाडामुळे पनवेलकडे जाणारी एक लोकल मध्येच थांबली. त्यामुळे प्रवाशांनी थेट रेल्वे रुळावरूनच पायी चालत पुढील स्टेशन गाठले. या बिघाडामुळे लोकल २५ ते ३० मिनिटे उशिराने धावत होती. ऑफिस सुटण्याची वेळ असल्यामुळे सर्वच स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती.