हलबा समाजाचे नागपुरात10 फेब्रुवारीला धरणे आंदोलन

नागपूर- आरक्षणाच्या मागणीसाठी राष्ट्रीय आदिम कृति समितीच्या माध्यमातून हलबा समाजही नागपुरातील संविधान चौकात 10 फेब्रुवारीला धरणे आंदोलन करणार आहे. शासनाने दिलेले आश्वासन पूर्ण केले नसल्यामुळे नाईलाजाने आम्हाला आंदोलन करावे लागत असल्याचे आंदोलक ॲड. नंदा पराते यांनी सांगितले.

हलबा, हलबी जमातीचे विविध प्रश्न सोडवण्याच्या मागणीसाठी राष्ट्रीय आदिम कृती समितीने 18 डिसेंबरला नागपुरातील विधीमंडळावर मोर्चा काढला होता. यावेळी शासनाने आदिवासी हलबा समाजाच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले. परंतु पुढे काहीही होत नसल्याने हलबा समाजात प्रचंड असंतोष आहे. हा रोष सरकारपर्यंत पोहचवण्यासाठी हलबा समाजाने आता 10 फेब्रुवारीला संविधान चौकात धरणे आंदोलन करण्याचे ठरवले आहे.

शासनाला हलबा समाजाला आरक्षणाबाबत येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी केंद्र शासनाला घटना दुरूस्तीचा प्रस्ताव पाठवणे, जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र निर्गमित करण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणे, हलबांची प्रलंबित प्रकरणे त्वरीत निकाली काढणे, अधिसंख्य कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करणे , हलबा जमातीच्या बेरोजगार युवकांसाठी एक हजार कोटी रुपयांचे भाग भांडवलासह महामंडळ निर्माण करण्याची मागणी केली जाणार असल्याचेही हलबा समाजाच्या नेत्या ॲड. नंदा पराते यांनी सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top