स्वीडनजवळ समुद्रतळाशी आढळले १७० वर्षे जुन्या जहाजाचे अवशेष

स्वीडन – स्वीडनजवळ बाल्टिक समुद्रात १९ व्या शतकात सुमारे १७० वर्षांपूर्वी बुडालेल्या एका जहाजाचे अवशेष आढळून आले आहेत.या ठिकाणी जहाजाच्या अवशेषांमध्ये शॅम्पेनच्या शंभर बाटल्या, मिनरल वॉटर आणि सिरॅमिकच्या काही वस्तु आढळल्या .स्वीडनच्या दक्षिणेस ३७ किलोमीटर अंतरावर बाल्टिक समुद्रात हे जहाज बुडाले होते.पोलंडचा पाणबुड्या स्टॅच्युरा याला हे अवशेष सापडले.तो गेली ४० वर्षांपासून बाल्टिक समुद्रात बुडालेल्या जहाजांच्या अवशेषांची छायाचित्रे टिपत आहे.स्टॅच्युराच्या कंपनीने दिलेल्या माहितीनुसार १७० वर्षांपूर्वी बुडालेल्या या जहाजाचे अवशेष सुस्थितीत आहेत.महत्वाची बाब म्हणजे या ठिकाणी सापडलेल्या शॅम्पेनच्या बाटल्या काचेच्या नसून मातीच्या आहेत. या बाटल्यांवर सेल्टझर बँडचे नाव कोरलेले आहे.१९ व्या शतकातील जर्मनीतील सर्वोत्कृष्ट शॅम्पेन ब्रँडपैकी सेल्टझर या ब्रँडचा समावेश आहे.ही शॅम्पेन खूप महाग असल्याने केवळ राजघराण्यातील व्यक्तीच ती विकत घेत असत. याशिवाय काही औषधांमध्येही सेल्टझर शॅम्पेनचा वापर केला जात असे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top