स्वामी विवेकानंद जयंतीला राष्ट्रीय युवा दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या

Swami Vivekananda Jayanti: दरवर्षी 12 जानेवारीला राष्ट्रीय युवा दिन साजरा (National Youth Day 2025)? केला जातो. याच दिवशी स्वामी विवेकानंद (Swami Vivekananda Jayanti) यांची जयंती देखील असते. स्वामी विवेकानंद यांना केवळ भारतातच नव्हे तर जगभरात त्यांच्या आदर्श आणि विचारांसाठी ओळखले जातात. त्यांचे विचार आजही तरूणांना प्रेरणा देतात. मात्र, स्वामी विवेकानंद जयंतीलाच राष्ट्रीय युवा दिन (National Youth Day 2025)? का साजरा केला जातो हे तुम्हाला माहितीये का? याविषयी जाणून घेऊया.

स्वामी विवेकानंद (Swami Vivekananda Jayanti) यांच्याविषयी माहिती

स्वामी विवेकानंद (Swami Vivekananda) यांचा कोलकत्ता येथे 12 जानेवारी 1963 रोजी जन्म झाला. 4 जुलै 1902 ला त्यांनी त्यांनी देहत्याग केला होता. त्यांचे वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त आणि आईचे नाव भुवनेश्वरी देवी होते. त्यांचे वडील कलकत्ता उच्च न्यायालयात वकिली करत असे. त्यांचे वडील पाश्चात्य संस्कृतीवर विश्वास ठेवत असे, त्यामुळे ते आपल्या मुलाला इंग्रजी शिक्षण देऊन पाश्चात्य संस्कृतीच्या पद्धतीने घडवू इच्छित होते. परंतु, वर्ष 1884 मध्येच त्यांच्या वडिलांचे निधन झाले आणि त्यांचे स्वप्न अपूर्णच राहिले.

स्वामी विवेकानंद (Swami Vivekananda Jayanti) यांचे लहानपणीचे नाव नरेंद्रनाथ होते. पुढे रामकृष्ण परमहंस यांना त्यांनी गुरु व संन्यास स्विकारला. त्यानंतर लोक त्यांना स्वामी विवेकानंद या नावाने ओळखू लागले. अमेरिकेतील शिकागो शहरात भरलेल्या जागतिक सर्वधर्म परिषदेत त्यांनी केलेले भाषण विशेष गाजले होते.

याच दिवशी का साजरा केला जातो राष्ट्रीय युवा दिन (National Youth Day 2025)?

स्वामी विवेकानंद यांचे विचार आजही तरूणांना प्रेरणा देतात. स्वामी विवेकानंद म्हणायचे, ‘मला शंभर तरुण द्या, मी संपूर्ण जग बदलून टाकीन.’ तरूणांमध्ये जग बदलण्याची क्षमता आहे, असे स्वामी विवेकानंद यांना वाटत असे. त्यांनीच राष्ट्रनिर्मितीसाठी तरुणांना प्रेरित केले होते. भारतीय तरुणांना प्रेरणा देणे, सकारात्मक बदल घडवून त्यांचे जीवन समृद्ध व आरोग्यदायी बनवणे, या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो.

भारतात 1985 पासून हा दिवस साजरा केला जाऊ लागला. संयुक्त राष्ट्राने 1984 ला ‘आंतरराष्ट्रीय युवा वर्ष’ घोषित केले. त्यानंतर भारत सरकारने 12 जानेवारी हा दिवस स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्ताने राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली.