रियाध
हज यात्रेपूर्वी सौदी अरेबियाने भारत आणि पाकिस्तानसह १४ देशांवर तात्पुरती व्हिसा बंदी लागू करण्यात आली. क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या नेतृत्वाखालील सरकारने हा निर्णय घेतला.हज यात्रेसाठी नोंदणी न करता येणाऱ्या यात्रेकरुंना रोखण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे.
सौदी अरेबियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही व्हिसा बंदी अस्थायी स्वरुपाची आहे. हज यात्रेच्या हंगामापर्यंत म्हणजे जूनच्या मध्यापर्यंत ही व्हिसाबंदी लागू करण्यात येणार आहे.हज यात्रेनंतर व्हिसा प्रक्रिया पुन्हा पूर्ववत केली जाणार आहे. परदेशी नागरिकांना १३ एप्रिलपर्यंत उमराह व्हिसावर देशात प्रवेश करण्यास परवानगी आहे.त्यांनंतर कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. ही निर्णय घेण्यामागे मुख्य कारण म्हणजे गेल्या वर्षी हज यात्रेदरम्यान झालेल्या गर्दीत १००० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनधिकृतपणे यात्रेसाठी आलेल्या लोकांचा समावेश होता.
