सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स नक्की किती व कशी कमाई करतात? वाचा

शरण्या अय्यर (Sharanya Iyer) हे नाव सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. यामागचे कारण म्हणजे तिने एका वर्षात जगभर प्रवास करण्यासाठी 50 लाख रुपये खर्च केले आहेत. तिने तिच्या खर्चाची माहिती सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर आता याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

शरण्या (Sharanya Iyer) ही एक ट्रॅव्हल कॉन्टेंट क्रिएटर (Travel content creator) आहे. ती तिच्या प्रवासाचे व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर करते व यातूनच तिची कमाई होते. तिच्या प्रवास खर्चाची माहिती समोर आल्यानंतर अनेक यूजर्स नक्की कमाईचा स्त्रोत काय आहे व सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स कमाई कशी करतात? असे प्रश्न विचारू लागले आहेत.

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स (Social Media Influencers) किती कमाई करतात?

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स किंवा कॉन्टेंट क्रिएटर्सची कमाई ही त्यांच्या सबस्क्राइबर्स आणि फॉलोअर्सवर अवलंबून असते. तुमचे जेवढे अधिक सबस्क्राइबर्स अथवा फॉलोअर्स असतील, तेवढी अधिक कमाई तुम्ही करू शकता. हा कमाईचा आकडा 10 हजार रुपयांपासून ते लाखो रुपयांपर्यंत असतो. स्वतःच्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक पोस्ट करण्यासाठी कॉन्टेंट क्रिएटर्स लाखो रुपये शुल्क घेतात.

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स कमाई (How do influencers make money) कशी करतात?

युट्यूब/इंस्टाग्राम मोनेटायझेशन – युट्यूब व इंस्टाग्रामवर जाहिरातीच्या माध्यमातून मिळणारे पैसे हा कॉन्टेंट क्रिएटर्सचा उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत आहे. जेवढे जास्त व्ह्यूज तेवढी अधिक कमाई होते.

स्पॉन्सर्ड पोस्ट्स – ब्रँड्स त्यांच्या उत्पादनांची जाहिरात करण्यासाठी इन्फ्लुएन्सर्सला पैसे देतात. तुमचे जेवढे अधिक फॉलोअर्स असतील, तेवढे अधिक पैसे एका स्पॉन्सर्ड पोस्ट्ससाठी मिळतात.

स्वतःचे प्रॉडक्ट/सेवांची – सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सला लाखो लोकं फॉलो करत असतात. त्यामुळे त्यांचे कोर्स, मर्चेंडाईज किंवा डिजिटल प्रॉडक्ट्स खरेदी करणाऱ्या ग्राहकांची संख्याही जास्त असते.

एफिलिएट मार्केटिंग – कॉन्टेंट क्रिएटर्सने शेअर केलेल्या प्रॉडक्ट लिंकद्वारे वस्तूची विक्री झाल्यास त्यांना कमिशन देखील मिळते.

इव्हेंट्स आणि कोलॅबरेशन – कार्यक्रमात सहभागी होऊन किंवा इतर प्रभावशाली लोकांसोबत काम इन्फ्लुएन्सर्सला लाखो रुपये कमवतात.शरण्या अय्यर (Sharanya Iyer) हे नाव सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. यामागचे कारण म्हणजे तिने एका वर्षात जगभर प्रवास करण्यासाठी 50 लाख रुपये खर्च केले आहेत. तिने तिच्या खर्चाची माहिती सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर आता याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

शरण्या (Sharanya Iyer) ही एक ट्रॅव्हल कॉन्टेंट क्रिएटर (Travel content creator) आहे. ती तिच्या प्रवासाचे व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर करते व यातूनच तिची कमाई होते. तिच्या प्रवास खर्चाची माहिती समोर आल्यानंतर अनेक यूजर्स नक्की कमाईचा स्त्रोत काय आहे व सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स कमाई कशी करतात? असे प्रश्न विचारू लागले आहेत.

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स (Social Media Influencers) किती कमाई करतात?

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स किंवा कॉन्टेंट क्रिएटर्सची कमाई ही त्यांच्या सबस्क्राइबर्स आणि फॉलोअर्सवर अवलंबून असते. तुमचे जेवढे अधिक सबस्क्राइबर्स अथवा फॉलोअर्स असतील, तेवढी अधिक कमाई तुम्ही करू शकता. हा कमाईचा आकडा 10 हजार रुपयांपासून ते लाखो रुपयांपर्यंत असतो. स्वतःच्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक पोस्ट करण्यासाठी कॉन्टेंट क्रिएटर्स लाखो रुपये शुल्क घेतात.

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स कमाई (How do influencers make money) कशी करतात?

युट्यूब/इंस्टाग्राम मोनेटायझेशन – युट्यूब व इंस्टाग्रामवर जाहिरातीच्या माध्यमातून मिळणारे पैसे हा कॉन्टेंट क्रिएटर्सचा उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत आहे. जेवढे जास्त व्ह्यूज तेवढी अधिक कमाई होते.

स्पॉन्सर्ड पोस्ट्स – ब्रँड्स त्यांच्या उत्पादनांची जाहिरात करण्यासाठी इन्फ्लुएन्सर्सला पैसे देतात. तुमचे जेवढे अधिक फॉलोअर्स असतील, तेवढे अधिक पैसे एका स्पॉन्सर्ड पोस्ट्ससाठी मिळतात.

स्वतःचे प्रॉडक्ट/सेवांची – सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सला लाखो लोकं फॉलो करत असतात. त्यामुळे त्यांचे कोर्स, मर्चेंडाईज किंवा डिजिटल प्रॉडक्ट्स खरेदी करणाऱ्या ग्राहकांची संख्याही जास्त असते.

एफिलिएट मार्केटिंग – कॉन्टेंट क्रिएटर्सने शेअर केलेल्या प्रॉडक्ट लिंकद्वारे वस्तूची विक्री झाल्यास त्यांना कमिशन देखील मिळते.

इव्हेंट्स आणि कोलॅबरेशन – कार्यक्रमात सहभागी होऊन किंवा इतर प्रभावशाली लोकांसोबत काम इन्फ्लुएन्सर्सला लाखो रुपये कमवतात.