सोलापुरात घरात स्फोट एकाचा मृत्यू !एक जखमी

सांगोला
राहत्या घरात झालेल्या स्फोटात एकाचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर भाजल्याने जखमी झाल्याची घटना सोलापुरात आज पहाटे घडली. जखमींवर पंढरपुर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृताच्या नातेवाईकांनी मुलाच्या घातपाताचा संशय व्यक्त केला असून या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून संबंधितावर हत्येचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी नातेवाईकांनी केली.
अतुल आत्माराम बाड (27) असे मृताचे नाव आहे तर दिपक विठोबा कुटे असे जखमीचे नाव आहे. सांगोला तालुक्यातील सुमारास महूद येथील दिघंची रोडवरील एका घरामध्ये पहाटे स्फोट झाला. स्फोटाच्या आवाजाने सुमारे 1 किमी परिसर हादरून गेल्याने लोक घराबाहेर पळाले तर स्फोटात घर उध्वस्त झाले. समोरील शटर सुमारे 250 फूट अंतरावर जाऊन फेकले गेले. याची माहिती मिळताच सांगोला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमीला तातडीने पंढरपूर येथे उपचार करता हलविले. सांगोला येथील ग्रामीण रुग्णालयासमोर मृत अतुल बाड याच्या नातेवाईकांनी प्रचंड गर्दी केली होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top