सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाची रोहित पवारांनी भेट घेतली

परभणी- परभणीमध्ये कोम्बिंग ऑपरेशनमध्ये मृत्युमुखी पडलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची आमदार रोहित पवारांनी भेट घेतली. पवार यांनी कुटुंबियांची विचारपूस केली. यावेळी उपस्थित असलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांशीही चर्चा केली. विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या माध्यमातून सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय देण्यासाठी पूर्ण क्षमतेने आवाज उठवला जाईल. आम्ही सर्वजण या कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे राहू, अशी ग्वाही रोहित पवारांनी दिली.