सोने एका दिवसात १७०० रुपयांनी महागले

मुंबई
ऐन लग्नसराईत सोन्याच्या दरात आज प्रति तोळ्यामागे १७१२ रुपयांची वाढ झाली. शुद्ध सोने म्हणजेच २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ६८,९६४ रुपयांवर खुला झाला. २८ मार्चला सोने प्रति तोळा ६७,२५२ रुपयांवर होते. २२ कॅरेट सोने ६३,१७१ रुपये, १८ कॅरेट सोने ५१,७२३ रुपये आणि १४ कॅरेट सोने ४०,३४४ रुपये झाले आहे.
अमेरिकेतील महागाईत घट झाल्याने फेडरल रिझर्व्ह बँक जूनमध्ये वर्षातील पहिली व्याजदर कपात करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर सोने दराने आज नवा उच्चांक गाठला. आंतराराष्ट्रीय बाजारात सुरुवातीला २,२५९ डॅालरचा उच्चांक गाठल्यानंतर स्पॅाट गोल्ड १२ टक्क्यांनी वाढून प्रति औस २.२५८.७९ डॅालरवर आले. दरम्यान, आज चांदीचा दर प्रति किलो ७४,१२७ रुपयांवरुन ७५,४०० रुपयांवर पोहोचला. मार्च महिन्यात सोन्याच्या दरात ४.६६० रुपयांची वाढ झाली होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top