सोनपंखी कमळ पक्षाचे आगमन

नाशिक – नांदूरमध्यमेश्वर या रामसर दर्जा मिळालेल्या पक्षी अभयारण्यात काही दिवसांपासून पडत असलेल्या पाऊस आणि वादळामुळे स्थलांतराची दिशा भरकटल्याने सोनपंखी कमळपक्षी प्रथमच या अभयारण्यात आले आहेत. सोनपंखी कमळपक्षी याचे शास्त्रीय नाव मेटोपिडिअस इंडिकस असे आहे. त्याच्या पंखांचा रंग पिवळसर तपकिरी असून त्यावर चकचकीत हिरव्या- जांभळ्या रंगाची छटा असते. डोके, मान, छाती काळ्या रंगाची असते. डोळ्याच्या वरच्या भागापासून ते मानेच्या मागील भागापर्यंत जाणारा पांढऱ्या रंगाचा पट्टा असतो. चोच हिरवट पिवळी असून वरील चोचीच्या बुडाशी लाल असते. चोचीपासून निघणारा निळसर लाल रंगाचा चट्टा कपाळापर्यंत जातो. शेपटी आखूड व जाड; तपकिरी लाल रंगाची असून तिच्या कडा काळ्या रंगाच्या असतात.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top