मुंबई – शेअर बाजारातील दुसऱ्या सत्रात आज मोठी घसरण झाल्यामुळे सलग ५ व्या दिवशी बाजार एका महिन्याच्या नीचांकी पातळीवर बंद झाला.निफ्टी ३६४ अंकांनी घसरून २४,५८७ वर बंद झाला, तर सेन्सेक्स ११७६ अंकांनी घसरून ७८,०४१ वर बंद झाला. निफ्टी बँक ८१६ अंकांनी घसरून ५०,७५९ वर बंद झाला.या पडझडीनंतर गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला.
जगभरातील मुख्य शेअर बाजारात घसरण सुरू असून त्यात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी पुन्हा जोरदार विक्री केली.याचा परिणाम भारतीय शेअर बाजारात आजही दिसून आला. सुरवातीला बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स-निफ्टी थोड्या घसरणीसह व्यवहार करत होते. मागील बंदच्या तुलनेत सेन्सेक्स ११७ अंकांनी वाढून ७९,३३५ वर उघडला.निफ्टी ९ अंकांनी वाढून २३,९६० वर तर बँक निफ्टी १७४ अंकांनी घसरून ५१,४०१ वर उघडला. त्यानंतर ही घसरण सुरु राहिली.