सेन्सेक्स-निफ्टीनेनवा उच्चांक गाठला

मुंबई – भारतीय शेअर बाजाराने आज ३१ वर्षांचा विक्रम मोडला. निफ्टी आज सलग १३ व्या सत्रात तेजीत बंद झाला. निफ्टीने २५,३३३ नवा उच्चांक गाठला. त्यानंतर निफ्टी ४२ अंकांच्या किरकोळ वाढीसह २५,२७८ वर स्थिरावला. तर सेन्सेक्सने ८२,७२५ चा नवा उच्चांक गाठला. त्यानंतर सेन्सेक्स १९४ अंकांनी वाढून ८२,५५९ वर बंद झाला.बाजारातील तेजीत आयटी, एफएमसीजी आणि बँकिग शेअर आघाडीवर राहिले. बँक, एफएमसीजी आणि आयटी निर्देशांक तेजीत बंद झाले. तर कॅपिट्ल गुड्स, मेटल, हेल्थकेअर, टेलिकॉम आणि मीडिया ०.४ ते १.६ टक्क्यांनी घसरले. बीएसई मिडकॅप निर्देशांक सपाट पातळीवर बंद झाला, तर स्मॉलकॅप निर्देशांक ०.४ टक्क्यांनी घसरला. बीएसई मिडकॅप निर्देशांकाने नवा सर्वकालीन उच्चांक नोंदवला. बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ४८ हजार कोटींनी वाढून ४६४.८७ लाख कोटींवर पोहोचले. याआधी शुक्रवारी ३० ऑगस्ट रोजी बाजार भांडवल ४६४.३९ लाख कोटींवर होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top