सूर्यग्रहणामुळे उत्तर अमेरिकेत काही भागांत शाळांना सुट्टी

वॉशिंग्टन

८ एप्रिलला वर्षातील पहिले सूर्यग्रहण होणार आहे. चैत्र अमावस्येचा हा दिवस अत्यंत मोठा आहे. अमावस्याच्या दिवशी सुमारे ५ तास २५ मिनिटे हे सूर्यग्रहण असेल. उत्तर अमेरिकेच्या काही भागात संपूर्ण सूर्यग्रहण दिसेल आणि ७ मिनिटे दिवसा पूर्ण काळोख होईल. यामुळे उत्तर अमेरिकेतील अनेक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

तब्बल ५० वर्षांनी सूर्यग्रहणाचा हा योग आल्याचे सांगितले जात आहे. सूर्यग्रहणात सूर्य दिवसा चंद्राला पूर्णपणे झाकतो आणि दिवसा अंधार होतो. हे सूर्यग्रहण कॅनडा, उत्तर अमेरिकेपासून मेक्सिकोपर्यंत दिसणार आहे. टेक्सास, ओक्लाहोमा, आर्कान्सा, मिसूरी, न्यूयॉर्क, पेनसिल्व्हेनिया, व्हरमाँट, इलिनॉय, इंडियाना, ओहायो, न्यू हॅम्पशायर आणि मेन या राज्यांमध्ये सूर्यग्रहण दिसणार आहे. यामुळे अनेक राज्यात शाळांना सुट्ट्या जाहिर करण्यात आल्या आहेत. हेज काउंटी, डेल व्हॅले, मनोर आणि लेक ट्रॅव्हिस या शाळांनी ग्रहणाच्या दिवशी सुट्टी जाहीर केली आहे. या सूर्यग्रहणाचा भारतामध्ये फार काही परिणाम होणार नाही. नासाचे शास्त्रज्ञ या सूर्यग्रहणाच्या काळात अनेक प्रयोग करणार आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top