सुहेलदेव पक्षाच्या सरचिटणीस नंदिनी राजभर यांची हत्या

संत कबीर नगर- सुहेलदेव भारतीय समाज पार्टीच्या (एसबीएसपी) महिला शाखेच्या प्रदेश सरचिटणिस नंदिनी राजभर (३०) यांची उत्तर प्रदेशमध्ये हत्या करण्यात आली आहे. त्यांच्या घरात त्यांचा मृतदेह आढळून आला . गेल्या काही दिवसांपासून त्यांना अज्ञान इसमांकडून जिवे मारण्याची दिली जात होती,असे सांगण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले . डिघा गावात राहणाऱ्या नंदिनी सुहेलदेव भारतीय समाज पार्टीच्या महिला शाखेच्या प्रदेश सरचिटणिस होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी त्या जिल्हा स्टेडियममध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर दुपारी दोन वाजता त्या घराकडे निघाल्या होत्या.
नंदिनी यांच्या सासू आरती देवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी चार वाजता त्या जेव्हा घरी पोहोचल्या तेव्हा त्यांना घराचा दरवाजा उघडा असल्याचे दिसले. त्यानंतर आरती देवींनी नंदिनी यांना आवाज दिला, पण त्यांना नंदिनी यांनी प्रतिसाद दिला नाही. घरात दुसरे कोणी नव्हते. एका खोलीत त्यांना नंदिनी मृतावस्थेत आढळल्या. त्यांनी तातडीने याची माहिती पोलिसांना दिली.नंदिनी यांची धारदार हत्याराने हत्या करण्यात आली असे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. मात्र त्यांची हत्या कोणी केली याचा उलगडा अद्याप झालेला नाही. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top