सुरेश म्हात्रेंची उमेदवारी जाहीर होताच एमएमआरडीएची गोदामांवर कारवाई

भिवंडी :

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून भिवंडी लोकसभा मतदारसंघातून सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र उमेदवारी जाहीर होताच म्हात्रेंच्या गोदामांवर एमएमआरडीएकडून कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे. येवई येथील आरकेलॉजी पार्क येथील गोदाम बांधकामांवर कारवाई करण्यासाठी एमएमआरडीए पुढे सरसावली आहे. एमएमआरडीएने राजकीय दबावातून कारवाई केल्याचा आरोप बाळूमामांनी केला आहे.

या कारवाईबाबत बोलताना म्हात्रे यांनी भिवंडीतील विद्यमान खासदार कपिल पाटलांवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, “जिनके घर शिशेके होते है, वो दुसरे के घर पर पत्थर नहीं फेका करते. पाठीमागून वार करण्यापेक्षा समोरून लढा. मी उभ्या केलेल्या गोदाम व्यवसायातून ९० हजार युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला, तालुक्यात अनधिकृत गोदाम व्यवसाय भ्रष्टाचाराची जननी कपिल पाटील हेच आहेत.

“संपूर्ण तालुक्यातील गोदाम बांधकामांना संरक्षण देण्यासाठी शासनाने अध्यादेश काढले आहेत. त्यानुसार सर्व बांधकाम संरक्षित करण्यासाठी प्रस्ताव दाखल आणि उच्च न्यायालयातून स्थगिती आदेश घेतले आहेत,” असे स्पष्टीकरणही बाळ्यामामा म्हात्रेंनी दिले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top