सुपरस्टार रजनीकांतच्या ‘जेलर २’ चा टीझर रिलीज

 दाक्षिणात्य सिनेमांची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे. पुष्पा-2 बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असताना आता सुपरस्टार रजनीकांत देखील नवीन चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. रजनीकांतच्या जेलर (Jailer) या चित्रपटाला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. आता अभिनेता जेलर-2 (Jailer 2) च्या माध्यमातून पुन्हा एकदा चाहत्यांच्या भेटीला येत आहे. चित्रपटाच्या मेकर्सने याचा टीझर रिलीज केला आहे.

रजनीकांतचा जेलर (Jailer) हा चित्रपट 2023 मध्ये रिलीज झाला होता. तेव्हापासूनच चाहते याच्या सीक्वेलची वाट पाहत होते. जेलर-2 च्या माध्यमातून रजनीकांत 74 वर्षांच्या वयात पुन्हा एकदा जबरदस्त अॅक्शन करताना दिसणार आहे.

टीझर तयार करण्यासाठी दिग्दर्शक नेल्सन आणि संगीत दिग्दर्शक अनिरुद्ध यांनी एकत्र काम केले असून, याला प्रेक्षकांची भरभरून पसंती मिळत आहे. टीझरमध्ये पाहायला मिळते की, चित्रपटाचे दिग्दर्शक नेल्सन आणि संगीत दिग्दर्शक अनिरुद्ध नवीन स्क्रिप्टबाबत चर्चा करत आहेत. त्याचवेळी आसपास गोळीबार आणि तोडफोड सुरू होते. यानंतर रजनीकांतची धमाकेदार एंट्री होते.

2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जेलर’ (Jailer 2) चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होता. हा चित्रपट रजनीकांतच्या कारकिर्दीतील सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट ठरला. या चित्रपटाने जगभरात 604.5 कोटी रुपये आणि भारतात 348.55 कोटी रुपयांची कमाई केली होती. जेलर-2 (Jailer 2) मध्ये रजनीकांत व्यतिरिक्त कोणते कलाकार असणार, तसेच चित्रपट कधी रिलीज होणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.