मुंबई – भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी डॉन पेटिट यांनी अंतराळात ख्रिसमस साजरा केला. नासाने एक्सवर फोटो पोस्ट करत ही माहिती दिली आहे. नासाने एक्सवर लिहिले की, आणखी एक दिवस, आणखी एक संघर्ष. नासाचे अंतराळवीर डॉन पेटिट आणि सुनिता विल्यम्स अंतराळ स्टेशनच्या कोलंबस प्रयोगशाळेत ख्रिसमस साजरा करत आहेत.
सुनिता विल्यम्स आणि डॉन पेटिट पुढील वर्षी मार्चअखेरीस किंवा एप्रिलच्या सुरुवातीला पृथ्वीवर परततील अशी अपेक्षा आहे. दरम्यान, सुनिता विल्यम्स यांची तब्येत दिवसेंदिवस खराब होत आहे. नासा सतत त्यांच्या तब्येतीवर लक्ष ठेवून असून काही दिवसांपूर्वीच त्यांच्या डोळ्यांची तपासणी करण्यात आली होती.