नाशिक – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (रिपाईं) शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांचा मुलगा दीपक बडगुजर याच्यावर अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोळीबाराची ही घटना तीन वर्षांपूर्वीची आहे.
जाधव यांच्यावर तीन वर्षांपूर्वी अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. गोळीबारात जाधव गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत पाच संशयित आरोपींना अटक केली आहे.त्यांची कसून चौकशी केली असता दीपक बडगुजर याच्या सांगण्यावरून जाधव यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता,असे निष्पन्न झाल्याने आता दीपक बडगुजर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत पोलिसांनी दबावाखाली बडगुजर याच्यावर गुन्हा दाखल केला,असा आरोप केला.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर शिवसेने त्रास देण्यासाठी नेत्यांना खोट्या गुन्ह्यात अडकविले जात आहे. जुने खटले उकरून काढले जात आहे. साक्षीदारांना मारहाण करून शिवसैनिकांची नावे घेण्यास सांगितले जात आहे,असे राऊत म्हणाले.