मुंबई- कुर्ला येथे बेस्ट बसने भरधाव वेगात धडक दिल्याने ७ लोकांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज दुपारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी )परिसरात ए २६ क्रमाकांच्या बसने एका पादचार्याला चिरडले. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. अणुशक्ती नगर येथून कुलाबा येथील इलेक्ट्रील हाऊसकडे निघालेली ही बस दुपारी ४.२५ वाजता सीएसएमटी परिसरात वालचंद हिरानंद मार्गावर आली असताना हा अपघात घडला.ही बस कंत्राटी कंपनीची होती.
