नवी दिल्ली – इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड (आयजीएल) आणि अदानी टोटल गॅस लिमिटेड या सिटी गॅस कंपन्या सीएनजीच्या दरात वाढ करण्याची मागणी केली आहे.
सरकारने १६ नोव्हेंबरपासून कमी किमतीच्या नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यात २० टक्क्यांपर्यंत कपात केली आहे. सिटी गॅस किरकोळ विक्रेते आयजीएल, दिल्ली आणि लगतच्या शहरांमध्ये सीएनजी किरकोळ विक्री करते. तर महानगर गॅस लिमिटेड मुंबईत सीएनजी विक्री करते. गुजरात आणि इतरत्र कार्यरत असलेल्या अदानी टोटल गॅस लिमिटेड यांनी नियामक फाइलिंग मध्ये पुरवठा कपात केल्यामुळे कंपनीच्या नफ्यात परिणाम झाला. त्यामुळे किंमतवाढीचे संकेत कंपन्या देत आहेत
मात्र, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय अधिकारी कंपन्यांच्या या प्रस्तावाशी सहमत नाही . कारण त्यांना वाटते की, किरकोळ विक्रेत्यांना मोठा नफा मिळत आहे. नवीन विहिरी किंवा आयात केलेल्या किंचित जास्त किमतीच्या एलएनजी गॅसमुळे त्यांचा खर्च काही प्रमाणात वाढत असला तरी त्यांना मिळत असलेल्या नफ्यावर मोठा परिणाम होणार नाही.