सिल्लोडमध्ये तीव्र पाणीटंचाई! २२ गावांना टँकरने पाणीपुरवठा

छत्रपती संभाजी नगर- जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात सध्या तीव्र पाणीटंचाई सुरू आहे. जमिनीतील पाणीपातळी झपाट्याने खालावत चालली आहे. त्यामुळे विहिरी, तलाव आटले आहेत. भीषण पाणीटंचाईमुळे तालुक्यातील तब्बल २२ गावांना टँकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू आहे,अशी माहिती पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी बी. पी. पगारे यांनी दिली.
तालुक्यातील २५ गावांना ५७ टँकरद्वारे दररोज ११५ खेपा केल्या जात आहेत. याशिवाय १५ विहिरी टँकर भरण्यासाठी अधिग्रहण करण्यात आल्या आहेत, तर ६ विहिरी प्रत्यक्ष गावांना पाणी घेण्यासाठी दिल्या आहेत. आतापर्यंत कुठल्याही गावाचा पाणीपुरवठा करण्याबाबतचा प्रस्ताव प्रलंबित नसल्याचेही पाणीपुरवठा विभाग अधिकारी पगारे यांनी सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top