सिटीलिंक बससेवा सलग तिसऱ्या दिवशी विस्कळीत

नाशिक

सिटीलिंकमधील बसचालकांनी पुकारलेल्या संपाचा आज तिसरा दिवस होता. पीएफची अडीच कोटींची संपूर्ण थकबाकी जोपर्यंत भरली जात नाही तोपर्यंत संप मागे न घेण्याची भूमिका वाहन चालकांनी घेतली आहे. ह्या संपामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. आज सलग तिसऱ्या दिवशी तपोवन आणि नाशिकरोड डेपोतील २४७५ बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या. तपोवनातील सर्वच १५० बस डेपोतच उभ्या होत्या.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top