गंगटोक- उत्तर सिक्कीममध्ये पावसाने हाहाकार माजविला आहे. राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस आणि पूर आल्याने संपर्क तुटला आहे. त्याठिकाणी हजारो पर्यटक आणि नागरिक अडकले होते.या सर्वाना सुखरूप बाहेर काढण्यासाठी लष्कराने तातडीने मदतकार्य सुरु केले आहे. भारतीय लष्करातील अभियंत्यांनी तर दुथडी भरून वाहणाऱ्या एका नदीवर अवघ्या ४८ तासात १५० फूट लांबीचा झुलता पूल उभारला . अभियंत्यांच्या या कामाचे कौतुक होत आहे.
लष्कराने २० नॉट्सपेक्षा जास्त वेगाने वाहणाऱ्या नदीपात्राच्या पाण्यावर झुलता पूल उभारण्यास सुरुवात केली आणि हे काम अवघ्या ४८ तासांत पूर्ण करून दाखवले.या पुलाचे बांधकाम अत्यंत आव्हानात्मक होते.प्रतिकूल हवामान आणि वेगाने वाहणारे पाणी असूनही लष्करी अभियंत्यांनी आपला कस लावून हे काम पूर्ण केले.