गंगटोक – सिक्कीममध्ये निवृत्त आमदारांना दरमहा किमान ५० हजार रुपये निवृत्तीवेतन देण्याचा निर्णय मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग यांनी घेतला आहे.निवृत्त आमदार महासंघाच्या स्थापना दिनानिमित्त शनिवारी आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री तमांग यांनी याबाबत घोषणा केली.आमदारकीचा कार्यकाळ फक्त एकदा पूर्ण करणाऱ्या आमदारांनाही या निर्णयामुळे आता दरमहा ५० हजार रुपये निवृत्तीवेतन मिळणार आहे. याआधी ही रक्कम २२ हजार रुपये एवढी होती.
