सासुरवाडीला झुकते माप दिल्याचा ऋषी सुनक यांच्यावर आरोप

लंडन
आपल्या सासरच्या इन्फोसीस कंपनीला झुकते माप दिल्याचा आरोप इंग्लडच्या विरोधी मजूर पक्षाने इंग्लडंचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यावर केला आहे.
इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक हे भारतीय वंशाचे व हिंदू असलेले पहिले पंतप्रधान आहेत. त्यांचा विवाह इन्फोसिस या कंपनीचे प्रमुख नारायण मुर्ती यांची कन्या अक्षता मुर्ती यांच्याशी झाला आहे. त्यांच्या पत्नीचे इन्फोसीस कंपनीत प्रचंड शेअर आहेत .पंतप्रधानाच्या सासरवाडीच्या इंफोसिस या कंपनीला इंग्लडमध्ये झुकते माप दिले जात असून व्यापार मंत्री डॉम्निक जॉन्सन यांनी इंफोसिसला नियम बाह्य सहकार्य केले आहे. एका अहवालानुसार इंग्लंडच्या व्यापार मंत्र्यांनी इंफोसिसला इंग्लडमध्ये आपला व्यापार वाढवण्यासाठी संपूर्ण सहकार्य केले असून इंफोसिस कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या एप्रिल २०२३ च्या बैठकीच्या वेळी व्यक्तीगत विजा योजनेच्या माध्यमातून त्यांना विजा दिला गेला असा आरोपही विरोधी पक्षाने केला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top