सावंतवाडीच्या नरेंद्र डोंगरावरील मोफत जंगल सफारी फसवी!

सावंतवाडी- तालुक्यातील प्रसिद्ध नरेंद्र डोंगरावर सुरू असलेली जंगल सफारी ही ३१ मार्चपर्यंत मोफत असणार असल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी जाहीर केली होती.मात्र येथील जंगल सफारीसाठी १०० रुपये आकारले जात असल्याने ही जंगल सफारी फसवी आहे की काय ? असा सवाल माजी आमदार परशुराम उपरकर समर्थक आशिष सुभेदार यांनी केला आहे.

आशिष सुभेदार यांनी म्हटले आहे की,नरेंद्र डोंगरावरील जंगल सफारीसाठी वन विभागाकडून १०० रुपये आकारले जात आहेत. त्यामुळे शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केलेली मोफत सफारीची घोषणा फसवी की वनविभागाचे अधिकारी मंत्री केसरकर यांचे ऐकतच नाहीत ? त्याचप्रमाणे सावंतवाडीत पर्यटन महोत्सव घेणार असल्याचेही मंत्री केसरकरांनी सांगितले होते.पण आचारसंहिता असल्याने तो आता होणार नाही.त्यामुळे हा पर्यटन महोत्सव पावसात घेणार का?असा सवालही आशिष सुभेदार यांनी केला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top