साताऱ्यात ब्रिटीशकालीन बोगद्यात पाण्याची गळती

सातारा- जिल्ह्यातील किल्ले अजिंक्यताऱ्याच्या पायथ्याशी असलेल्या ब्रिटिशकालीन बोगद्यात मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती सुरू आहे. मागील चारपाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे.

सातारा तालुक्यातील अंबवडे,परळी,सज्जनगड आणि भाटमरळी भागाला शहराशी जोडणारा हा ब्रिटिशकालीन बोगदा आहे. किल्ले अजिंक्यताऱ्याच्या पायथ्याशी हा बोगदा असून त्याचे संपूर्ण बांधकाम दगडी स्वरूपाचे आहे.परंतु गेल्या चारपाच दिवसांपासून सातारा शहर आणि परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे.त्यामुळे डोंगरमाथ्यावरील पावसाचे पाणी झिरपून बोगद्याला पाझर फुटले आहेत. पाझरणार्‍या पाण्याची धार बोगद्यात सुरू आहे.दरम्यान, अजूनही दगडी बांधकाम असलेला हा बोगदा मजबूत स्थितीत असल्याचा निर्वाळा नुकताच बांधकाम विभागाने दिला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top