सातारा – खटाव तालुक्यातील शिरसवडी येथील तळेवस्ती येथील उरमोडी कॅनॉल मध्ये बुडून रिया इंगळे (५) व सत्यम इंगळे (७)या बहीण-भावाचा मृत्यू झाला. काल रिया इंगळेचा मृतदेह सापडला होता. तर आज सकाळी गोपूज हद्दीतील आरे शिवाराजवळ कॅनॉलमध्ये सत्यम इंगळेचा मृतदेह सापडला. या घटनेमुळे शिरसवडी गावावर शोककळा पसरली.
शिरसवडी येथील शिवाजी इंगळे यांचा मुलगा सत्यम इयत्ता दुसरीत आणि मुलगी अंगणवाडीत होती. दोघेही गोपूजवाडा येथे शिक्षण घेण्यासाठी जात होती. काल शाळा सुटल्यावर दोघेही घरी परत न आल्याने कुटुंबियांनी शोधाशोध केली. त्यानंतर काही वेळाने मुलगी रियाचा मृतदेह कॅनॉलमध्ये आढळून आला. रियाचा मृतदेह सापडल्यानंतर सत्यमला शोधण्यासाठी ग्रामस्थ, पोलीस आणि अधिकाऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम सुरु होती.पण पावसामुळे मदतकार्यात अडथळा निर्माण झाला होता.
