मुंबई- राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना त्यांची जात-धर्म न पाहता गणवेश दिला जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत केली.
राज्यातील सर्वच विद्यार्थ्यांना गणवेश मिळेल. पहिल्यांदाच सरकारने असा निर्णय घेतला आहे. ड्रेसच्या क्वालिटीमध्ये कोणता फरक पडलाय, हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधानसभेत सांगितले आहे गणवेशसंदर्भात संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे राबवण्यात आली आहे, असे फडणवीस यांनी विरोधी पक्षनेत्यांनी विद्यार्थ्यांच्या गणवेशाबाबतचा उपस्थित केलेल्या मुद्द्यावर उत्तर देताना सांगितले. मुलींच्या शिक्षणासाठी 50 टक्के शिष्यवृत्ती होती. ती आता 100 टक्के देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, असेही त्यांनी पुढे सांगितले.
गेल्या सव्वा दोन वर्षांत राज्य सरकारने महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर नेउन ठेवल्याचे फडणवीस म्हणाले. काही योजना मुख्यमंत्र्यांनी देखील घोषित केल्या आहेत. त्यामध्ये मुख्यमंत्री तीर्थ योजना आहे. याद्वारे राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थ दर्शन करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री वयोश्री योजना आहे. ज्यामध्ये केंद्र सरकारच्या वयोश्री योजनेमध्ये जे गॅझेट नाहीत पण 60 वर्षांवरील लोकांना लागतात. ते सर्व गॅझेट राज्यातील वयोश्री योजनेतून देण्यात येणार आहेत. राज्य सरकारने गेल्या सव्वा दोन वर्षांत महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर ठेवले आहे. अर्थव्यवस्थेचाही मोठा विस्तार राज्यसरकारने केला आहे.