Bank Of Maharashtra Officers Recruitment 2025: बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छित असलेल्या तरूणांसाठी एक उत्तम संधी आहे. बँक ऑफ महाराष्ट्रने (Bank Of Maharashtra) स्केल II, III, IV, V, VI आणि VII अधिकारी पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. या भरतीसाठी पदवीधर आणि पदव्युत्तर पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात. या पदासांठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, इच्छुक उमेदवार 17 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवारांना बँक ऑफ महाराष्ट्रची अधिकृत वेबसाइट bankofmaharashtra.in वर जाऊन अर्ज करता येईल.
पदांची संख्या
बँक ऑफ महाराष्ट्र भरती 2025 (Bank Jobs) प्रक्रियेंतर्गत एकूण १७३ जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये जनरल मॅनेजर, डेप्युटी जनरल मॅनेजर, असिस्टंट जनरल मॅनेजर, सिनियर मॅनेजर आणि मॅनेजर या पदांचा समावेश आहे.
पात्रता
पदानुसार शैक्षणिक व वय पात्रता वेगवेगळी आहे. उमेदवारांकडे बॅचलर, बीई, बीटेक पदवीसोबत अनुभव असणे गरजेचे आहे. उमेदवाराचे किमान वयमर्यादा 22 वर्षे, तर कमाल वयमर्यादा 55 वर्षे असावी. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमांनुसार वयमर्यादेत सवलत दिली जाईल.
निवड प्रक्रिया
या पदांसाठी योग्य उमेदवारांच्या निवडीसाठी कोणतीही लिखित परीक्षा घेणार नाही. उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे होईल. मुलाखत एकूण 100 गुणांसाठी असेल. सामान्य श्रेणीतील उमेदवारांना किमान 50 गुण आणि एससी, एसटी, पीडब्ल्यूडी प्रवर्गातील उमेदवारांना किमान 45 गुण मिळवावे लागतील.
अर्जाचे शुल्क
जनरल, ईडब्ल्यूएस आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 1180 रुपये आणि एससी, एसटी, पीडब्ल्यूडी प्रवर्गातील उमेदवारांना फक्त ११८ रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. हे पेमेंट ऑनलाइन माध्यमातून करावे लागेल.
अर्ज करण्याची प्रक्रिया
- अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइट bankofmaharashtra.in ला भेट द्या.
- वेबसाइटच्या होमपेजवरील Current Openingsया सेक्शनवर क्लिक करा.
- यानंतर, भरतीशी संबंधित Application Link वर क्लिक करा.
- आता वेबसाइटवर नोंदणी करण्यासाठी आवश्यक माहिती भरा
- नोंदणीनंतर लॉग इन करून अर्ज प्रक्रिया पूर्ण करा.
- शेवटी शुल्क भरा आणि अर्ज सबमिट करा.