वैजापूर – समृद्धी महामार्गावर बस व कंटेनर मध्ये झालेल्या अपघातात २० जण जखमी झाले असून यातील चौघांची प्रकृती गंभीर आहे. आज पहाटे ५ वाजता हा अपघात घडला. हा अपघात इतका भीषण होता की बसच्या समोरच्या भागाचा चक्काचूर झाला.संभाजीनगरहून शिर्डीकडे जाणाऱ्या या बसने समृद्धी महामार्गावर वैजापूर जवळ एका कंटेनरला पाठीमागून धडक दिली. या अपघातात ट्रॅव्हल बसमधील २० प्रवासी जखमी झाले असून त्यांना वैजापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातातील ४ गंभीर जखमींना संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
