समृद्धी महामार्गाचा तिसरा टप्पा सोमवारी सेवेत

नागपूर
मुंबई नागपूर समृद्धी महामार्गातील भरवीर – इगतपुरी दरम्यानचा २५ किमी लांबीचा तिसरा टप्पा सोमवारपासून सेवेत दाखल होत असून सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते या टप्प्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे. यामुळे आता नागपूर ते इगतपुरी थेट प्रवास करणे शक्य होईल. मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग एकुण ७०१ किलोमीटर्सचा असून नागपूर – भरवीर हा ६०० किलोमीटर्सचा टप्पा सध्या वाहतूक सेवेत दाखल आहे. या तिसऱ्या टप्प्याच्या लोकार्पणानंतर एकूण ६२५ किमी लांबीचा महामार्ग वाहतुकीसाठी कार्यान्वित होईल. इगतपुरी – आमणे हा चौथा असेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top