समय रैना कोण आहे? त्याची दरमहिन्याला कमाई किती आहे ? वाचा

Samay Raina net worth: सध्या India’s Got Latent या शो ची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. या कार्यक्रमात युट्यूबर रणवीर अलाहबादियाने केलेल्या कथित अश्लील वक्तव्यामुळे वादाला तोंड फुटले आहे. शो मधील वादग्रस्त वक्तव्यामुळे 5 जणांवर एफआयर देखील दाखल करण्यात आली आहे. या वादामुळे समय रैना हे नाव पुन्हा चर्चेत आले आहे.

समय रैना नक्की कोण आहे व त्यांच्याकडे किती संपत्ती आहे? याविषयी जाणून घेऊयात.

समय रैनाचा जन्म जम्मूमधील एका पारंपरिक काश्मिरी पंडित कुटुंबात झाला आहे. त्याने पुण्यातून प्रिंट इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. तसेच, ओपन माइक इव्हेंट्समध्येही तो सहभागी होऊ लागला. ‘कॉमिकस्तान’च्या दुसऱ्या सीझनची ट्रॉफी जिंकल्यानंतर तो पहिल्यांदा चर्चेत आला.

कोविड-19 दरम्यान त्याने ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धांचे आयोजन करमण्यास सुरुवात केली होती. अनेक प्रसिद्ध बुद्धिबळपटू त्याने आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आहेत. पश्चिम बंगाल आणि आसाममधील पूरग्रस्तांसाठीही त्याने निधी उभारला होता. गेल्यावर्षी त्याने युट्यूबवर ‘India’s Got Latent’ या शो ची सुरुवात केली होती.

समयची संपत्ती किती?

कॉमेडियन समय रैनाची संपत्ती ऐकून तुम्हाला धक्का बसू शकतो. रिपोर्टनुसार, त्याची एकूण संपत्ती जवळपास 195 कोटी रुपये आहे. त्याच्यी युट्यूब व इतर शो मधून होणारी दरमहिन्याची कमाई जवळपास 1.5 कोटी रुपये आहे. समय रैनाचे इंस्टाग्रामवर 6 मिलियन फॉलोअर्स आणि यूट्यूब चॅनेलला 7 मिलियनहून अधिक सब्सक्राइबर्स आहेत.