सचीन तेंडूलकर अमेरिकाराष्ट्रीय क्रिकेट लिगमध्ये

ह्युस्टन – भारताचा विक्रमवीर सचीन तेंडूलकर अमेरिकेच्या राष्ट्रीय क्रिकेट लीगच्या आयोजक कंपनीबरोबर जोडला गेला असून त्याच्या सहभागामुळे अमेरिकेतील क्रिकेट खेळाला चालना मिळण्याचा विश्वास एनसीएलने व्यक्त केला आहे.या निर्णयाची माहिती देण्यासाठी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात एनसीएलने म्हटले आहे की, सचीन तेंडूलकरचा समावेश प्रेरणादायी असून ज्याप्रमाणे पेलेमुळे फुटबॉल व बाबे रुथ या खेळाडूंमुळे बास्केटबॉलला प्रतिष्ठा मिळाली त्याचप्रमाणे सचीनमुळे अमेरिकेतील तरुणांमध्ये क्रिकेटविषयी आस्था निर्माण होऊन अमेरिकेतही क्रिकेट महत्त्वाचा खेळ होईल. सचीन तेंडूलकर यांनीही या सहभागाविषयी आनंद व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, क्रिकेट हा माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग असून मला अमेरिकेच्या राष्ट्रीय क्रिकेट मध्ये सामील होतांना आनंद होत आहे.अमेरिकेन राष्ट्रीय क्रिकेट लीगच्या माध्यमातून जागतिक दर्जाचे क्रिकेटपटू निर्माण व्हावेत. अधिकाधिक तरुणांनी या खेळाकडे वळण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. अमेरिकन क्रिकेट लीगचा शुभारंभ गायक मिका सिंग याच्या गायनाच्या कार्यक्रमाने होणार असून यंदाच्या लीगमध्ये क्रिकेटचे दिग्गज खेळाडू सुनील गावस्कर, जहीर अब्बास, वासीम अक्रम, दिलीप वेंगसरकर, सर विविअन रिचर्डस, वेंकटेश प्रसाद, सनथ जयसुर्या, मोईन खान, ब्लेर फ्रॅन्कलीन हे नव्या खेळाडूंचे मार्गदर्शक म्हणून सहभागी होत आहेत. या सामन्यात विविध देशांच्या दिग्गज क्रिकेटपटूंचा खेळ पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top