नवी दिल्ली – लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार प्रियांका गांधी व काँग्रेस खासदारांनी अदानीविरोधात काळी जॅकेट घालून संसद परिसरात आंदोलन केले. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज आठवा दिवस होता.’मोदी-अदानी एक है, अदानी सेफ है असा मजकूर जॅकेटवर लिहिला होता. काँग्रेस नेत्यांनी मोदी आणि अदानी यांच्या विरोधात ‘हुकूमशाही चालणार नाही’, ‘मोदी – अदानी एक है,मोदी-अदानी चोर है,अशा घोषणा दिल्या. अदानी समूहावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) स्थापन करण्याची काँग्रेस खासदारांनी मागणी केली आहे.
अदानी प्रकरणात मोदी चौकशी करू शकत नाहीत. कारण त्यांनी तसे केले तर त्यांचीही चौकशी केली जाईल. शेवटी मोदी – अदानी एक आहेत, असा आरोप राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केला.