वायनाड – वायनाड पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी आज पहिल्यांदाच आपल्या मतदारसंघात जाऊन मतदारांचे आभार मानले. यावेळी त्यांच्या बरोबर काँग्रेस खासदार व त्यांचे ज्येष्ठ बंधू राहुल गांधीही उपस्थित होते. वायनाड मतदारसंघात आज त्यांनी ४ जाहीर सभा घेतल्या. यावेळी हजारो वायनाडवासीय उपस्थित होते.
वायनाडच्या खासदार म्हणून लोकसभेत शपथ घेतल्यानंतर आज प्रियांका गांधी याचे राहुल याच्यासह वायनाडमध्ये जाऊन मतदारांशी संवाद साधला. या मतदारसंघात कोझिकोड, करुलाई निलांबुर, वंदूर, एडवन्ना, एरानाड येथे जाहीर सभा घेतल्या. प्रियंका गांधी यावेळी म्हणाल्या की, मी आतापर्यंत ३५ वर्ष निवडणुकीचा प्रचार केला, यावेळी मी पहिल्यांदा लढले व तुम्ही मला विजयी केलेत. संसदेत मी केवळ तुमच्यासाठी हे लक्षात ठेवा. तुमचे प्रेम व विश्वास माझ्यासाठी फार महत्त्वाचा आहे.
राहुल गांधी यावेळी म्हणाले की, प्रियंका गांधी या तुमच्या आता खासदार आहेत. त्यांना तुम्ही विजयी केलेत, जो आत्मविश्वास दिलात त्याबद्दल मी आभारी आहे. प्रियांका गांधी या तुमच्या अधिकृत खासदार असून मी तुमचा अनौपचारिक खासदार आहे. देशातील कोणत्याही मतदारसंघात अशा प्रकारचे दोन खासदार नाहीत, जे केवळ वायनाड मध्ये आहेत.