वाराणसी- संभल येथे बंद अवस्थेत मंदिर सापडल्यानंतर वाराणसीतील मुस्लिमबहुल भाग असलेल्या मदनपुरा या मुस्लीमबहुल वस्तीत आणखी एक प्राचीन शिवमंदिर सापडल्याचा दावा केला जात आहे. या मंदिराचे छायाचित्र व्हायरल होताच पोलीस आणि प्रशासनाने कारवाई सुरू केली. हिंदू संघटनाही घटनास्थळी पोहोचल्या. मंदिराला असलेले जुने कुलूप तोडून पोलिसांनी आत प्रवेश केला.
हे मंदिर अनेक वर्षांपासून बंद असलेले सिद्धेश्वर महादेवाचे असल्याचे सांगितले जाते. असाही दावा केला जात आहे की, मंदिराजवळील गोल मचाण ही सिद्धेश्वर विहीर होती. सध्या खबरदारीचा उपाय म्हणून मंदिराभोवती तैनात करण्यात आले आहेत. पोलिस प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
मदनपुरा हा मुस्लीमबहुल परिसर असून येथील प्रसिद्ध गोल चबुतरासमोर हे मंदिर आहे. मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरावर मुस्लिमांनी कब्जा केला आहे. त्यांनीच या मंदिराला कुलूप लावले, असे म्हटले जात आहे.इतिहासकार अनिल कुमार सिंह म्हणाले की,मंदिराच्या शैलीवरून ते तीनशे वर्षांहून अधिक जुने असल्याचे स्पष्ट होते.